In Parner taluka, the arrears of the power distribution company have increased 
अहिल्यानगर

थकबाकी वसुलीचे आव्हान; पारनेर तालुक्‍यात महावितरणचे 352 कोटी रुपये थकीत

मार्तंड बुचुडे

पारनेर (अहमदनगर) :  तालुक्‍यात वीज वितरण कंपनीची थकबाकी सुमारे 352 कोटी 47 लाख रुपयांवर गेली आहे. यात सर्वाधिक थकबाकी कृषिपंपांची सुमारे 347 कोटी रुपये आहे. त्याखालोखाल घरगुती ग्राहकांची थकबाकी दोन कोटी 54 लाख रुपये आहे. रकमेच्या वसुलीसाठी वीज वितरणचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू आहेत. 
 
तालुक्‍यात व्यापारी ग्राहकांची 85 लाख, तर औद्योगिक विभागाची थकबाकी सुमारे 2 कोटी 8 लाख रुपये आहे. वीज वितरण कंपनी यापुढील काळात अधिक वसुली होणाऱ्या भागातील ग्राहकांसाठी चांगल्या सुविधा व योजना राबविणार आहे. वसूल झालेल्या रकमेपैकी 33 टक्के रक्कम त्याच भागातील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वीज वितरण कंपनी वापरणार आहे. तालुक्‍यात जास्तीत जास्त वसुली करून ग्राहकांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी उपअभियंता प्रशांत आडभाई प्रयत्नशील आहेत.
 
राज्यात कोरोनामुळे सर्वच व्यवहार थंडावले होते. शेतकरी अडचणीत आले होते. अनेक दिवस उद्योगधंदे बंद होते. अजूनही व्यवसाय फारसे पूर्ववत झालेले नाहीत. त्यामुळे थकबाकीचे प्रमाण वाढले आहे. सप्टेंबर 2020 अखेर कृषिपंपांची 50 टक्के थकीत रक्कम भरल्यास शेतकऱ्यांना बिलात 50 टक्के सवलत मिळणार आहे. शिवाय, बिलावरील दंड, व्याज माफ केले जाणार आहे. मात्र, ही सवलत मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना यापुढे 2024 पर्यंत कृषिपंपांची बिले नियमित भरावी लागतील. बिले थकविल्यास ही सवलत मिळणार नाही. शिवाय, पुन्हा मूळ बिल दंड- व्याजासह भरावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat: अंबादास दानवेंनी लावलेली आग अन् फडणवीसांनी केलेला गेम, संजय शिरसाट कसे फसले?

Latest Marathi News Updates : पुण्यात महिलेच्या सूपमध्ये सापडले झुरळ

Pratap Sarnaik: आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर बसणार कारवाईचा चाप, परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मराठी नाट्य परिषदेतर्फे खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन; कुठे कराल अर्ज? वाचा नियम व अटी

API Duty: आता उपचार स्वस्त होणार! औषधांच्या किमतीबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, कुणाला फायदा?

SCROLL FOR NEXT